एके दिवशी डॉक्टर योगेश सातव सरांकडून विचारणा झाली कि डेक्कन क्लीफहँगर -५ म्हणजेच DC साठी येणार का ?
मी लगेच हो म्हणालो. डॉक्टरांचा या आधी DC चा भरपूर अनुभव होता. त्यांनी मागील वर्षी २ क्रमांक च पारितोषिक पण जिंकले होते.
आमची टीम रजिस्टर झाली , टीम सह्याद्री !
डॉक्टर योगेश सातव , डॉक्टर सुरेख निकम , दिपक धुमाळ आणि मी.
या पैकी सातव आणि निकम सरांच्या या आधी ३ DC झाल्या होत्या , दिपक धुमाळ ने हि मागील वर्षी सह्याद्री टीम मध्ये सपोर्ट क्रू च काम केले होते. त्यामुळे त्यांना या स्पर्धेचा अंदाज होता. तसे या स्पर्धे बद्धल मला फार काही कल्पना नव्हती. सायकल सफरींची आवड असल्यामुळे हा हि एक प्रयत्न्न करूयात असे वाटले.
हि सायकल स्पर्धा असल्यामुळे इथे वेळेचा फारच गांभीर्याने विचार होतो. घड्याळाच्या काट्यावर सगळे काही अवलंबून. सगळ्यात महत्वाचं काम असते ते सपोर्ट क्रू चे.
आमच्या सपोर्ट क्रू मध्ये भानुदास डोके , विनोद बोरोले , शैलेश चिकटे आणि पंचक्षरी हिरेमठ, यापैकी फक्त भानुदास ने च या पूर्वी च्या DC मधील स्पर्धेत सपोर्ट क्रू चे काम केलेलं होत. सगळे जण उत्साही होते.
माझी तर सायकल खरेदी पासून सुरवात होणार होती.
सायकल तशा ३ प्रकारच्या - माउंटन , हायब्रीड आणि रोड सायकल. माझ्याकडे फक्त हायब्रीड च असल्यामुळे आणि लडाख सायकलिंग वेळी माउंटन सायकल ची थोडी फार सवय असल्यामुळे रोड सायकल आपण सहज चालवू असे उगाचच वाटत होते.
परंतु वेळ फारच कमी होता, स्पर्धा दीड महिन्यावर येऊन ठेपली होती. सायकल खरेदी करून थोडा तरी सराव होणे गरजेचे होते. चौकशी सुरु झाली, सगळ्यांकडून सायकल बद्दल जाणून घेतले.
स्वतः डॉक्टर योगेश सातव सर आणि डॉक्टर सुरेख निकम सर माझ्यासमवेत येऊन सायकल खरेदी साठी मदत केली. डॉक्टर सुहास लोंढे सरानी सुद्धा स्वतः दुकानदाराशी बोलून सायकलची किंमत कमी करावयास लावले.
रोड सायकल वजनानं फारच हलकी आणि अगदी छोटेसे रुंदीचे टायर यामुळे हि नक्की जोरात पळणार याचा अंदाज आला. पण याचे गियर बाकीच्या दोन्ही सायकल प्रकारापेक्षा वेगळे होते. ते शिकावे लागणार होते.
रोड सायकल वर बसण्याची पद्धत सुद्धा अगदी वेगळी.
त्यातच सातारा ची हिल मॅरेथॉन असल्यामुळे सगळ्यांचा पळण्याचा सराव चालू होता , हि मॅरेथॉन होई पर्यंत एकत्र सायकल सराव चालू होणार नव्हता. तसेही कामाच्या आणि बाकीच्या काही गोष्टीमुळे शेवटी सराव चालू होण्यासाठी ऑक्टोबर उजाडला , स्पर्धा बरोबर एका महिन्यावर होती.
सगळ्यात पहिली सरावाची सुरवात पुणे सोलापूर रोड वर झाली, UK ( उरळी कांचन रिटर्न राईड ) त्या आधी थोडे फार गुगल करून गियर कसे बदलावे या बद्दल जाणून घेतले होते. पण प्रत्यक्षात वेळ आली आणि गडबड होण्यास सुरवात झाली, जिथे गियर कमी करायचे ते न करता भलतेच होत होते. सातव आणि निकम सर या वेळी मला काही सूचना देत होते
शेवटी ३० किलोमीटर ची पहिली प्रॅक्टिस राईड पूर्ण झाली, या पूर्वी सायकल चालवण्याचा स्पीड २३ किलोमीटर प्रति तासाच्या पुढे कधीही गेला नव्हता, तो या वेळी ३० वर जाऊन पोहोचला होता . फारच हायसे वाटत होते , मनात रोड बाइक बद्दल जी भीती होती ती कमी होण्यास मदत झाली होती.
आता एक मोठी प्रॅक्टिस राईड करायची होती , पुणे कात्रज ते महाबळेश्वर साधारण पणे १०० किलोमीटर ज्यात DC चा मार्ग पण पाहून होणार होता . खंबाटकी आणि पसरणी घाट सुद्धाया मध्ये होणार होता . ज्या प्रमाणे आमची सह्याद्री टीम होती तशीच आमच्या रणहोलिक ग्रुप च्या आणखी ५-६ टीम होत्या. सर्व जण या प्रॅक्टिस राइड साठी आमच्या सोबत होते. सकाळी सहा ते दुपारी १२ पर्यंत असा तो प्रवास होणार होता.
अपेक्षे प्रमाणे हि सुद्धा राइड छान झाली. सातारा महामार्ग वर सायकल जोरात पळत होत्या. सर्व जण पसरणी चा घाट मारून एका ठिकाणी थांबले. डॉक्टर लांडे सर सर्व सहकारी मित्रांना या राइड ला सपोर्ट करत होते. त्यांचा उत्साह बघून मला आपल्या घरातलं कोणी तरी आपल्या बरोबर आहे असे वाटत असे. लडाख मधील घाटांची सवय झाल्यामुळे पसरणी जास्त कठीण गेला नाही , रहदारी मात्र खूपच जास्त होती. मग एका गेस्ट या हाऊस मध्ये मस्त पैकी जेवण करून कार ने पुण्याला परत निघालो. सायकल स्टॅन्ड चा अनुभव या वेळी आला , सायकल या स्टॅन्ड ला कशा लावल्या पाहिजे आणि कोणती काळजी घ्यावी जेणे करून सायकल खराब होणार नाही , या सगळ्या गोष्टी हाताखालून जात होत्या. ग्रुप मध्ये असण्याचा खूपच फायदा होत होता.
त्या नंतर एकदा दिवेघाटात प्रॅक्टिस राइड साठी गेलो होतो , नेहमी प्रमाणे घाट उतरताना फारच हळू हळू चालवत होतो.
अशा प्रकारे आमच्या फक्त ३ च प्रॅक्टिस राइड झाल्या. आमचा एक सहकारी दीपक दौंड मध्ये राहत असल्यामुळे तिकडेच तो सराव करत होता. सातव सरांच्या मते फारच कमी सराव झाला होता. मला मात्र गियर आणि सायकल बऱ्यापैकी चालवता येत होती यातच मी समाधानी होतो . आता सपोर्ट क्रू बरोबर एक बैठक घेऊन या रेस बद्धल च्या चर्चा झाल्या . अनेक मुद्धे आणि त्यावर उहापोह झाला.
बरोबरच बाकीच्या लागणाऱ्या गोष्टी खरेदी केल्या जात होत्या हवा भरण्यासाठी छोटासा पंप , सायकलच्या अतिरिक्त ट्यूब , हॅन्ड ग्लोव्हस आणि बरेच काही.
DC रेस च्या एक दिवस आधी तुम्हाला भूगाव ला जाऊन बाईक म्हणजेच सायकल ची आणि त्या बरोबर असणाऱ्या स्वारांची चाचणी पार करावी लागते , तसेच सायकल ला रात्री साठी रेडियम लावावे लागते. सपोर्ट कार ची पण चाचणी असते , २ सपोर्ट कार आम्ही
सर्व तयारी सह आम्ही गोष्टी पूर्ण केल्या.
या वेळी खूप साऱ्या सायकल पाहावयास भेटल्या आणि बाकीच्या ग्रुप मधील लोकांसमवेत चर्चा झाली. सोलो RAAM इंडियन फिनिशर डॉक्टर अमित समर्थ यांचा RAAM बद्धल चा अनुभव ऐकला.
इतके सारे सायकल वेडे पाहून बरे वाटले. बाकी आमच्या डॉक्टर राहुल झांझुर्णे सरांच्या मताप्रमाणे हि DC म्हणजे एक प्रकारची वारीचं आहे आणि यात सहभागी होणारे सगळे वारकरी !
दुसऱ्या दिवशी स्पर्धा सुरु होणार होती, मनात चलबिचल चालू झाली होती, रात्री लवकर झोपून पहाटे ४ लाच हडपसर ला डॉक्टर सातवांच्या घरी पोहोचलो , निकम आणि भानुदास पण आलेले होते, सातव सरांच्या घरचे सगळे जागेच होते , सामान पटापट गाडी मध्ये भरले
पराठा आणि चहा घेऊन आम्ही निघालो, रस्त्यात पंचक्षरी ना घेतले, दुसरी गाडी पण आमच्या आधी निघाली होती, भुगाव ला साधारणपणे 6 ला आम्ही पोहोचलो,
सोलो रायडर्सनी साडे पाच च्या सुमारास सुरवात करून स्पर्धे ला सुरवात केली होती, आता लवकरच टीम रेस वाल्याना सोडनार होते, 2 , 3 आणि 4 लोकांच्या अशा वेगवेगळ्या टीम होत्या, आमच्या टीम चा नंबर ४४४ ,टीम वाल्याना सोडायला चालू केले होते , जय भवानी जय शिवाजी च्या जय घोषात सर्व जण आपल्या आपल्या रायडर्स ना प्रोत्साहित करत होते. आम्ही तो पर्यंत सायकल परत एकदा तपासून पहिल्या , हवा भरून तयार झाल्या होत्या. आता आमच्या टीम चा नंबर येईपर्यंत वाट पाहत होतो. तो पर्यंत आणखी एक नवीन गोष्ट समजली , २ सपोर्ट वाहनांपैकी एकाच वाहन पसरणी घाट कडे जाऊ देणार होते आणि दुसरे वाहन , सातारा च्या बाजूने पुढे जाऊन थांबणार असे शेवटच्या क्षणाला समजले. अचानक झाल्याला या बदला मुळे थोडी गडबड झाली पण योगेश सरानी सर्वाना याची कल्पना देऊन त्या प्रमाणे नियोजन केले.
सकाळचे जवळपास ८ वाजले होते , मागील वर्षाच्या मानाने या वेळी बराच उशीर झाला होता ,
सुरवातीचे साधारण पणे ८० किलोमीटर च नियोजन तयार होते , सर्वाना आपल्या आपल्या भागाची कल्पना देण्यात आली होती ,
शेवटी , ८ वाजून ५ मिनीटांनी आमच्या टीम ची सुरवात झाली , डॉक्टर सुरेख निकम सर सुरवातीचे १० किलोमीटर चालवणार होते , भूगाव पासून मंगेशकर हॉस्पिटल पर्यंत. , त्यानंतर दीपक धुमाळ , त्या नंतर मी आणि माझ्या नंतर सातव सर. असे एका प्रकारे रिले होणार होती
सोलो रायडर्सनी साडे पाच च्या सुमारास सुरवात करून स्पर्धे ला सुरवात केली होती, आता लवकरच टीम रेस वाल्याना सोडनार होते, 2 , 3 आणि 4 लोकांच्या अशा वेगवेगळ्या टीम होत्या, आमच्या टीम चा नंबर ४४४ ,टीम वाल्याना सोडायला चालू केले होते , जय भवानी जय शिवाजी च्या जय घोषात सर्व जण आपल्या आपल्या रायडर्स ना प्रोत्साहित करत होते. आम्ही तो पर्यंत सायकल परत एकदा तपासून पहिल्या , हवा भरून तयार झाल्या होत्या. आता आमच्या टीम चा नंबर येईपर्यंत वाट पाहत होतो. तो पर्यंत आणखी एक नवीन गोष्ट समजली , २ सपोर्ट वाहनांपैकी एकाच वाहन पसरणी घाट कडे जाऊ देणार होते आणि दुसरे वाहन , सातारा च्या बाजूने पुढे जाऊन थांबणार असे शेवटच्या क्षणाला समजले. अचानक झाल्याला या बदला मुळे थोडी गडबड झाली पण योगेश सरानी सर्वाना याची कल्पना देऊन त्या प्रमाणे नियोजन केले.
सकाळचे जवळपास ८ वाजले होते , मागील वर्षाच्या मानाने या वेळी बराच उशीर झाला होता ,
सुरवातीचे साधारण पणे ८० किलोमीटर च नियोजन तयार होते , सर्वाना आपल्या आपल्या भागाची कल्पना देण्यात आली होती ,
शेवटी , ८ वाजून ५ मिनीटांनी आमच्या टीम ची सुरवात झाली , डॉक्टर सुरेख निकम सर सुरवातीचे १० किलोमीटर चालवणार होते , भूगाव पासून मंगेशकर हॉस्पिटल पर्यंत. , त्यानंतर दीपक धुमाळ , त्या नंतर मी आणि माझ्या नंतर सातव सर. असे एका प्रकारे रिले होणार होती
आधी नियोजन केल्या प्रमाणे जास्तीत जास्त १० किलोमीटर आणि कमीत कमी ५ किलोमीटर चे अंतर प्रत्येक रायडर चालवणार होता म्हणजेच २० मिनिटं पेक्षा जास्त कोणीही चालवणार नाही , याचे कारण म्हणजे रायडर जास्त थकत नाही आणि जोरात सायकल चालवून सरासरी वेग जास्त राहील पण या मध्ये एकाच काळजी घेण्यात आली होती , रायडर बदलण्याचा कालावधी कमीत कमी राहील.
डॉक्टर सुरेख निकम सरानी जोरदार सुरवात करून दिली होती , दिपक ने हि त्यांनंतर जोरदार सायकल चालवली. दिपक ची सायकल हाइब्रिड प्रकारामध्ये होती, रोड बाईक पेक्षा जास्त ताकत खर्च होत होती . त्यांनतर माझा नंबर आला , मला पहिलाच भाग कात्रज घाटाचा होता , ३ किलोमीटर हळूहळू असणारा चढ जास्त वाटत होता , मी तो पूर्ण करून डॉक्टर सातव सरांना पुढचा टप्पा दिला , त्यांना हि घाटाची चढण होती आणि कात्रज बोगदा पार केला , महामार्गावर रहदारी भरपूर होती.
रस्त्या वर आमच्या सारखेच बरेच टीम रायडर सायकल चालवत होते, रस्ता सायकल स्वारांनी गजबजून गेला होता , एक प्रकारची जत्रा भरली होती. मला सायकल वर घाट वेगात उतरणं जमत नसल्यामुळे , घाट चढणे मला करणे भाग होते. खंबाटकी चा सुरवातीचा घाट मला मिळाला, घाट ३ किलोमीटर पार केल्यावर निकम सरानी पुढचा टप्पा घेतला , निकम सरांना त्यामध्ये उतार पण मिळणार होता त्यांचा तो खूपच आवडता होता , आता पर्यंत त्यांनी २०० , ३०० किलोमीटर च्या BRM पूर्ण केल्या आहेत , सायकलिंग फारच त्यांचा जिव्हाळ्याचा विषय.
निकम सर उतारावर ७५ किलोमीटर प्रति तास च्या वेगाने सायकल चालवत होते , त्यांचा हा वेग फेसबुक वर सुद्धा लाइव्ह केला गेला
विनोद बोरोले सर जितके शक्य होईल तितके फेसबुक च्या लाइव्ह ची जबाबदारी सांभाळत होते , घरच्यांना या पद्धतीने प्रत्यक्षात स्पर्धेचा आनंद घेता येणार होता


Comments