एके दिवशी डॉक्टर योगेश सातव सरांकडून विचारणा झाली कि डेक्कन क्लीफहँगर -५ म्हणजेच DC साठी येणार का ? मी लगेच हो म्हणालो. डॉक्टरांचा या आधी DC चा भरपूर अनुभव होता. त्यांनी मागील वर्षी २ क्रमांक च पारितोषिक पण जिंकले होते. आमची टीम रजिस्टर झाली , टीम सह्याद्री ! डॉक्टर योगेश सातव , डॉक्टर सुरेख निकम , दिपक धुमाळ आणि मी. या पैकी सातव आणि निकम सरांच्या या आधी ३ DC झाल्या होत्या , दिपक धुमाळ ने हि मागील वर्षी सह्याद्री टीम मध्ये सपोर्ट क्रू च काम केले होते. त्यामुळे त्यांना या स्पर्धेचा अंदाज होता. तसे या स्पर्धे बद्धल मला फार काही कल्पना नव्हती. सायकल सफरींची आवड असल्यामुळे हा हि एक प्रयत्न्न करूयात असे वाटले. हि सायकल स्पर्धा असल्यामुळे इथे वेळेचा फारच गांभीर्याने विचार होतो. घड्याळाच्या काट्यावर सगळे काही अवलंबून. सगळ्यात महत्वाचं काम असते ते सपोर्ट क्रू चे. आमच्या सपोर्ट क्रू मध्ये भानुदास डोके , विनोद बोरोले , शैलेश चिकटे आणि पंचक्षरी हिरेमठ, यापैकी फक्त भानुदास ने च या पूर्वी च्या DC मधील स्पर...
gorakshnath@gmail.com